आज दिनांक 3 ऑक्टोबर रोजी दुपारी बाराच्या दरम्यान नांदेड जिल्हयातील अर्धापूर तालुक्यातील देगाव कुराडा येथे एका 45 वर्षीय मेंढपाळाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली .. रामराव डोके असे मयताचे नाव आहे .. कर्ज आणि धनगर आरक्षणासाठी त्यांनी आत्महत्या केली असुन तशी चिट्टी त्यांनी लीहली .. अर्धापूर पोलीसांनी चिट्टी जप्त केली रामराव डोके यांच्यावर खाजगी कर्ज होतें.शिवाय ते धनगर आरक्षण लढ्यात सक्रिय होतें . याच कारणाने त्यांनी आत्महत्या केल्याच्या दावा नातेवाइकानी केला