कुंभोज व परिसरातील गणेशोत्सवात आता धार्मिक धामधूमसोबत राजकीय रंगही चढू लागले आहेत.आगामी ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, गणेश मंडळांचे व्यासपीठ राजकीय प्रचाराचे माध्यम बनले आहे.मंडपांच्या उद्घाटन सोहळ्यांपासून सांस्कृतिक कार्यक्रमांपर्यंत स्थानिक राजकीय नेत्यांची उपस्थिती वाढली असून,मंचावरून राजकीय संदेशवहनाचा प्रसार केला जात आहे.शुक्रवार दिनांक 29ऑगस्ट व आज शनिवार दिनांक 30 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता गावात ठीक ठिकाणी,आगामी निवडणुकीसाठी प्रसार केला जात आहे.