दारव्हा शहर व तालुक्यातील महावितरणच्या ढिसाळ कारभाराविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शहरातील उपकार्यकारी अभियंता कार्यालयावर धडक दिली. नागरिकांच्या सातत्याने वाढत असलेल्या तक्रारींमुळे संतप्त झालेल्या मनसे कार्यकर्त्यांनी कार्यालयातील अभियंत्याच्या रिकाम्या खुर्चीला बेशरमाचे झाड व हार अर्पण करून आज दु. १. वा.अनोख्या पद्धतीने निषेध नोंदविला.