परळी तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून संततधार पावसाचा जोर कायम असून नद्या, नाले, ओढे मोठ्या प्रमाणावर वाहू लागले आहेत. या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील महत्त्वाचा ननंदज येथील बोरना प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला असून आज प्रकल्पातून पाणी ओव्हरफ्लो होऊ लागले आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. पावसामुळे पाणीपातळी वाढत असल्याने नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी, अनावश्यकपणे नदी-नाल्याजवळ जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.