१७ ऑगस्ट रोजी न्यूयॉर्कमध्ये फेडरेशन ऑफ इंडियन असोशिएशन्स आणि छत्रपती फाऊंडेशनच्या वतीने भारताच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त इंडिया डे परेडचे भव्य आयोजन करण्यात आले. या परेडमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा कीर्तीरथ दिमाखात सादर करण्यात आला. अभिनेत्री रश्मीका मंदाना आणि अभिनेता विजय देवेरकोंडा यांना ग्रँड मार्शलचा मान मिळाला. मिशीगन राज्याचे खासदार श्री श्री ठाणेदार हे कीर्तीरथावर विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. न्यूयॉर्कचे महापौर एरिक आडम्स यांनी परेडचे उद्घाटन केले तर भारताचे राजदूत बिनय