शहरातील यशवंत विद्यालयाच्या जवळ एका तीस वर्षीय युवकाचा मृत अवस्थेत मृतदेह आढळून आल्याची घटना आज दिनांक ८ सप्टेंबर रोजी दुपारी १.३० वाजे दरम्यान उघडकीस आली आहे.मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर असे की,शेगाव शहरातील यशवंत विद्यालयाच्या जवळ एका युवकाचा मृतदेह मृत अवस्थेत नागरिकांना दिसून आला. यावेळी नागरिकांनी शहर पोलिसांना याची माहिती दिली शहर पोलिसांनी त्या युवकाची ओळख काही तासातच पटवली आहे. सदर मृतकाचे नाव शुभम अर्जुन करांगडे वय ३० वर्षे राहणार ऐकलारा बानोदा तालुका संग्रामपूर असे आहे.