गणपती हे आराध्य दैवत म्हणून ओळखले जाते. गणेशोत्सवाचे महत्त्व लक्षात घेऊनच लोकमान्य टिळक यांनी स्वातंत्र्यप्राप्तीसाठी लोकसहभाग महत्त्वाचा मानून त्याला सार्वजनिक रूप दिले. कोणताही उत्सव साजरा करताना पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही, याची काळजी आपण सर्वांनी घेणे आवश्यक आहे. गणेशोत्सवामधील पावित्र्य आणि पर्यावरण संरक्षण यासाठी गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा होणे, ही काळाची गरज आहे. यासाठी आपण सर्वांनी आग्रही राहिले पाहिजे, अशी अपेक्षा राज्य सरकारमधील मंत्र्यांनी व्यक्त केले.