श्रीक्षेत्र थेऊर येथे, गेली ५० वर्षापूर्वीपासून वास्तव्यास असलेल्या, भिल्ल समाजाला प्रदीर्घ काळानंतर, अखेर जातीचे दाखले उपलब्ध झाले आहेत. हा समाज गेली अनेक वर्षांपासून थेऊर येथे मासेमारी व ढोल पथकाचा व्यवसाय करीत आहे. हा समाज दाखले उपलब्ध होण्यासाठी, गेली अनेक वर्ष झगडत होता अखेर १०० भिल्ल कुटुंबांना, स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच जातीचे दाखले उपलब्ध झाले आहेत. शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज महाराज अभियान कार्यक्रम अंतर्गत, भटके विमुक्त दिवासाचे औचित्य साधुन दाखले वाटप करण्यात आले.