तालुक्यात व शहरात हरितालिका व्रत व पूजन महिलांनी मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरा करीत आहे. सकाळपासूनच अनेक घरांमध्ये महिलांनी पूजन सुरुवात केली आहे .सुवासिनी महिला पतीच्या दीर्घायुष्यासाठी निरोगी आरोग्य आणि अखंड सौभाग्य साठी व्रत करतात. तर कुमारीका इच्छित आदर्श पती प्राप्तीसाठी हा व्रत करतात. आध्यात्मिक दृष्ट्या व्रतामुळे मन वाणी शरीराची शुद्धता आत्मस्वयम आणि भक्ती वाढण्यास मदत मिळते .पूर्ण रात्रभर पूजन करून दुसऱ्या दिवशी नदीवर शिरवून व्रत पूर्ण करतात.