निकम व उघडे टोळीतील मुख्य आरोपी विकी पंजाबी याला गुंडाविरोधी पथकाने तब्बल आठ वर्षानंतर कुल्लू, राज्य हिमाचल प्रदेश येथून ताब्यात घेतले आहे.निकम टोळीतील किरण राहुल निकम हा मोटरसायकलने पंचवटी भागातून जात असताना त्याच्या विरोधी उघडे टोळीतील संतोष उघडे, संतोष पगारे यांनी त्याला रस्त्यात अडवुन गणेश उघडे,बंडू मुर्तडक व त्यांचे इतर साथीदार यांनी किरण निकम याला धारदार शस्त्राने मारहाण करून जीवे ठार मारले होते.या गुन्ह्यामध्ये शामिल असलेला विकास उर्फ विकी पंजाबी हा फरार झाला होता.