तालुक्यातील मुंडीपार जवळील लिंब पुलाजवळ लोह्याचे पाईप घेऊन जाणारा ट्रक पलटल्याने ट्रक चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना दिनांक 2 सप्टेंबर च्या मध्यरात्री 1:30 च्या सुमारास घडली. ट्रकचालक संजय शहारे वय 39 वर्षे रा.चोपा ता. गोरेगाव (हल्ली मुक्काम रायपूर) असे मृतक युवकाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार मृतक संजय शहारे हा रायपूर वरून ट्रकमधे लोह्याचे पाईप भरून आपल्या गावी चोपा आला होता.व तेथुन एकटाच मुंबईकडे जाण्यासाठी निघाला होता.