घरासमोर उभ्या असलेल्या एका महिलेवर रस्त्याने जात असलेल्या गायीने हल्ला केल्याने सदर महिलेचा रुग्णालयात नेत असताना वाटेतच मृत्यू झाल्याची घटना 20 ऑगस्टला सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास घडली असून सदर महिलेला वाचविण्यासाठी गेलेल्या दोन महिला व दोन इसमानवरही गायीने हल्ला केल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. बेबीताई भगत असे मृतक महिलेचे नाव आहे.