अमरावती महानगरपालिका, माझी अमरावती फाउंडेशन व सात्विक गणपती यांच्या संयुक्त विद्यमाने ‘माझी वसुंधरा अभियान ६.०’ अंतर्गत आज २३ ऑगस्ट शनिवार रोजी सकाळी ९ वाजता सांस्कृतिक भवन, अमरावती येथे पर्यावरणपूरक गणेश मूर्ती निर्मिती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. यावेळी महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या हस्ते दिपप्रज्वलन आणि उद्घाटन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यामध्ये पर्यावरणपूरक गणेशमूर्ती निर्मिती हा उपक्रम प्रथमच राबविण्यात आला....