अकोला जिल्ह्यातील पातुर तालुक्यात आलेगाव - विवरा फाटा वळणावर आज दुपारी टोयोटा इनोव्हा कारचा भीषण अपघात झालाये. दरम्यान, चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी खोल साईडला जाऊन झाडावर आदळली. गाडीचे मोठे नुकसान झाले असून इनोव्हा बुलढाणा पासिंग असल्याचे समजते. अपघात अत्यंत जोरदार होता मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनास्थळी स्थानिक नागरिकांनी धाव घेत मदतकार्य केले. अधिक तपास पोलिसांचा सुरू आहे.