बोदवड शहरात विद्यानगर आहे. या विद्यानगरात अंकित भास्कर बोरसे हे राहतात. त्यांनी त्यांच्या घराच्या बाहेर त्यांची मोटरसायकल क्रमांक एम.एच.१९ डी. डब्ल्यू.१३७८ ही लावली होती. तेव्हा घराबाहेर लावलेली त्यांची ही मोटर सायकल कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरी केली. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर प्रारंभी त्यांनी मोटरसायकलचा सर्वत्र शोध घेतला. मात्र, मोटरसायकल कुठेच मिळून आली नाही. तेव्हा याप्रकरणी बोदवड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.