गडहिंग्लज पोलीस ठाण्यात दाखल अपघात प्रकरणातील वाहन सोडण्यासाठी तसेच गुन्ह्यातील कलमे कमी करण्याच्या मोबदल्यात तब्बल ६०,००० रुपयांची लाच मागणाऱ्या महिला पोलीस उपनिरीक्षकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शनिवारी रात्री रंगेहात अटक केली आहे.अशी माहिती आज रविवार दिनांक ६ जुलै सकाळी १० वाजता उपअधीक्षक वैष्णवी पाटील यांनी दिली.