"श्री गणेश आरोग्य अभियान" अंतर्गत सामुदायिक आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार 28 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर 2025 या कालावधीत शहरातील प्रमुख गणेश मंडळांच्या ठिकाणी ही शिबिरे भरविण्यात येणार आहेत.जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष बैठकीत हा निर्णय आज दि 27 आगस्ट 12 वाजता सामन्य रुग्णालयात घेण्यात आला. बैठकीला डॉ. हेमचंद कन्नाके (निवासी वैद्यकीय अधिकारी), डॉ. निवृत्ती जिवने आदींसह मंडळाचे प्रतिनिधी उपस्थित होते.