कंधार शहरातील मुख्य रस्त्यासह विविध भागातील रोडवर मोकाट व रोगट कुत्र्यानी टोळी सर्रासपणे दिसून येत असून याकडे नगर पालिका प्रशासनाने लक्ष देत ह्या रोगग्रस्त कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होते. आजरोजी दुपारी 4 च्या सुमारास आपले नाव न सांगण्याच्या अटीवर एका नागरिकांने म्हटले आहे की हे कुत्रे शहरातील मुख्य रोडवर फिरत असल्याने लहान बालके तथा शाळेत विद्यार्थ्यांची हा मोकाट कुत्र्यासमोरून फिरायची हिम्मत होत नाही. ह्या रोगट कुत्र्याने एखाद्या रोगाची लागण नागरिकांना होऊ शकते..