चंद्रपूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी उखडलेल्या रस्त्यांच्या बाबतीत आज स्वतः दौरा करून अधिकाऱ्यांना दटावले आणि फटकावलेही. चंद्रपूर-मुल, चंद्रपूर -बामणी, चंद्रपूर- जाम या रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत मुनगंटीवार यांनी अधिकाऱ्यांना सवाल विचारला. देखभाल कालावधी पूर्ण होण्याच्या आधी हे सर्व रस्ते कंत्राटदाराकडून दुरुस्त करून घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. रस्त्याच्या कडा भरल्या नसल्याच्या कारणावरून अधिकाऱ्यांना त्यांनी तंबी दिली.