श्री. संत गजानन महाराज यांची पालखी खामगाववरून उद्या ३१ जुलै रोजी पहाटे ५ वाजता शेगावकडे मार्गस्थ होईल. यावेळी भाविक मोठ्या संख्येने शेगाव पायी वारी करणार आहेत. पालखीचे व भाविकांचे ठिकठिकाणी स्वागत होणार असून त्यांच्यासाठी चहा, नाश्ता, महाप्रसाद वितरणाची व्यवस्था विविध सेवाभावी संघटनांनी केली आहे. यामुळे खामगाव-शेगाव हा राज्यमहामार्ग सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. या मार्गावरील वाहतूक बस स्टॅन्ड ते शेलोडी रोड तींत्रव मार्गे वळविण्यात आली.