राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान अंतर्गत आनंदवन निकेतन कृषी महाविद्यालयाच्या वतीने वतीने आज दि 18 जुलै 11 वाजता मुरदगाव येथे एक दिवसीय शेतकरी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांना शेतीविषयक व उत्पादन वाढीबाबत डॉ. आर. व्ही. महाजन, आर. व्ही. तायडे यांनी विस्तृत मार्गदर्शन केले. प्रशिक्षण ला परिसरातील महिला व पुरुष शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.