पुणे- अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीने १७ वे छत्रपती संभाजी महाराज मराठी साहित्य संमेलन रविवार दिनांक ५ ऑक्टोबर २०२५ रोजी महात्मा फुले सांस्कृतिक भवन वानवडी पुणे येथे होणार असल्याची माहिती अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. शरद गोरे यांनी दिली आहे. यावेळी अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे प. म. कार्याध्यक्ष. विक्रम मालन आप्पासो शिंदे उपस्थित होते.