नवीन कामठी पोलिसांनी कुंभारी कॉलनी येथे सुरू असलेल्या जुगारावर छापा मार कार्यवाही केली. घटनास्थळावरून डावावरील रोख रक्कम दहा मोबाईल आणि इतर साहित्य असा एकूण 97 हजार 720 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी तब्बल 13 आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहे. आरोपीविरुद्ध नवीन कामठी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे