गुरुवारी दुपारी १ वाजता सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल दिनाच्या निमित्ताने आढावा बैठक जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी घेतली. त्यानंतर त्यांनी जिल्हा माहिती कार्यालयाद्वारे पत्रकारांना माहिती दिली की महसूल विभागाने केलेल्या कामकाजाचा आढावा जनतेसमोर ठेवण्याकरता दि. १ ऑगस्ट रोजी महसूल दिन साजरा करण्यात येतो. त्या निमित्ताने दि. १ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट या काळात महसूल सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहात विविध शिबिरे, उपक्रम, महसूल अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.