‘ऑपरेशन प्रहार’अंतर्गत उरळ पोलिसांची धडक कारवाई. उरळ पोलिसांनी ‘ऑपरेशन प्रहार’ मोहिमेअंतर्गत ग्राम हातरून येथे रात्री छापा टाकून इमानउल्ला खान तवगार खान (४७) याच्या घरातून ७ किलो कापलेले गोमांस आणि लोखंडी सुरा असा एकूण १,४५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी आरोपीविरुद्ध महाराष्ट्र पशु संरक्षण कायदा आणि भारतीय दंड संहिता (भादंवि) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई ठाणेदार पंकज कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलिसांची ही धडक कारवाई परिसरात चर्चा सुरू आहे