देऊळगाव राजा दिनांक ११ सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता शहराचे ग्रामदैवत प्रति तिरुपती श्री बालाजी महाराज यांचा अश्विन यात्रा उत्सव श्री बालाजी संस्थान तर्फे जाहीर करण्यात आला दसऱ्याच्या दिवशी मध्ये रात्री श्री बालाजी महाराजांची मिरवणूक निघणार असून चतुर्थीला लळीत उत्सव होणार असल्याची माहिती श्री संस्थांच्या वतीने मंदिरासमोर प्रसिद्धी फलक लावून जाहीर करण्यात आली