गणेशोत्सवाची धूमधडाक्यात तयारी सुरू असतानाच घाटकोपर पोलिस ठाण्यातही "बाप्पा"चे पारंपरिक, भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात आज मंगळवार दिनांक २६ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता आगमन झाले. “घाटकोपर पोलिस ठाण्याचा राजा” म्हणून ओळखला जाणारा हा गणपती दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य साजशृंगाराने सजलेला, पोलिस दलाच्या वतीने भक्तिभावाने विराजमान करण्यात आला.