स्थानिक गुन्हे शाखा पथक बुलढाणा यांनी तालुक्यातील कुरणगाड येथून काळया बाजारात जाणारा रेशनचा तांदूळ जप्त केला आहे. तांदूळ व ट्रक सह एकूण 42 लाख रुपयाचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखा पथकाने जप्त करून तीन आरोपींना अटक केली आहे. सदरचे कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.