लाखनी तालुक्यातील मौजा लाखोरी येथे एक दुःखद घटना घडली आहे. श्रीकृष्ण उर्फ रुपेश पुरुषोत्तम भदाडे (वय ३२, रा. लाखोरी) या तरुणाचा विजेचा करंट लागून अकाली मृत्यू झाल्याने संपूर्ण लाखोरी गावात आणि परिसरात शोककळा पसरली आहे. ही घटना दि. २८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वा. दरम्यान लाखोरी येथील कबड्डी ग्राऊंडजवळ घडली. प्रकृती बिघडल्याने रुपेश भदाडे यांना तातडीने लाखनी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना इलेक्ट्रिक करंट लागल्यामुळे त्यांचा मृत्य....