डोंबिवली कल्याण रस्त्यावर पलावा उड्डाण पुलाजवळ एक पाईप लाईन फुटल्याची घटना घडली. पाईपलाईन फुटल्याने लाखो लिटर पाण्याची नासाडी झाली आहे. पाण्याचा वेग प्रचंड असल्याने आकाशामध्ये उंचच उंच पाण्याचे फवारे उडत होते. अनेक नागरिक पाण्याचे उंच उंच उडणारे फवारे मोबाईल मध्ये चित्रित करत होते. पाईपलाईन फुटल्यामुळे परिसर जलमय झाला आहे तसेच लाखो लिटर पाणी वाया गेले आहे.