चाळीसगाव(प्रतिनिधी) संघर्ष मराठा योद्धा मनोज जरांगे-पाटील यांचे चार दिवसापासून मुंबई येथे आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरू आहे.तरी त्यांच्या या उपोषणाला चाळीसगाव येथील छत्रपती शाहू महाराज मराठा समाज परिवर्तन मंडळाने आज दि.१ सप्टेंबर २०२५ रोजी चाळीसगावचे तहसीलदार प्रशांत पाटील यांच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाला लेखी निवेदनाद्वारे जाहीर पाठिंबा दिला आहे.