धुळे शहरातील साक्री रोड व्ही डब्लु एस कॉलेज पाठिमागील बाहुबली नगरात 50 वर्षिय पुरुषाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.सदर मयताचे नाव शेखर नामदेव गवळी वय 50 राहणार बाहुबली नगर साक्री रोड धुळे अशी माहिती 8 सप्टेंबर सोमवारी दुपारी तीन वाजून तीस मिनिटांच्या दरम्यान शहर पोलीसांनी दिली आहे. साक्री रोड बाहुबली नगरात राहते घरात सात सप्टेंबर सकाळी 11 वाजेच्या दरम्यान शेखर गवळी यांनी किचनमध्ये स्लॅपच्या लोखंडी कडील दोरीच्या साह्याने गळफास घेतलेल्या स्थितीत आढळल्याने एकच खळबळ उडाली.