आज दुपारी ४ वाजता दर्यापूर शहरातील बारा खोल्या येथील युवती ही तिच्या भावासोबत चंद्रभागा नदीवर गणपती विसर्जनासाठी गेली होती.गणपती विसर्जन केल्या नंतर आरतीचे ताट वाहून जात असल्याचे युवतीच्या लक्षात आल्याने आणि युवतीला पोहायला येत असल्याने त्या युवतीने ताट काढण्यासाठी नदीत उडी घेतली मात्र तीची पोहण्याची शक्ती कमी पडल्याने ती चंद्रभागा नदीच्या प्रवाहात वाहून गेली. उपस्थित नागरिकांनी युवती वाहत जात असल्याचे लक्षात येताच नदीत उडी घेऊन तिला बाहेर काढले आणि रुग्णालयात दाखल केले.