चिखलदरा तालुक्यातील सुमिता गावाजवळील खंडू नदीत आज सकाळी सुमारे ९ वाजता आणखी एक अज्ञात मृतदेह आढळल्याने गाव परिसरात खळबळ उडाली.नदीकाठी असलेल्या नागरिकांना पाण्यात तरंगणारा मृतदेह दिसताच त्यांनी तत्काळ पोलीस पाटलाला कळविले.दरम्यान, माहिती मिळताच शोध पथकाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह बाहेर काढला. यानंतर चिखलदरा पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनसाठी चुर्णी रुग्णालयात पाठविण्यात आला.