चंद्रपूर येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत संचालक पदी गोंडपिपरी येथील उल्हास करपे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचा वडोली येथील सीबीसीसी बँकेच्या शाखेत आज दिनांक सहा ऑगस्टला दुपारी दोन वाजताच्या दरम्यान शिवसेनेचे नेते सुरज माडगूळवार यांच्या नेतृत्वात बँक कर्मचारी बचत गटातील महिला जेष्ठ कार्यकर्ते व नागरिकांच्या वतीने शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.