हिंगणघाट विधानसभा श्रेत्रातील गिरड खुर्सापार शेत शिवारात वाघाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे.यामुळे शेतकरी व शेतमजूरांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून शेतीचे कामे खोळंबली आहे.या वांघाचा तातडीने बंदोबस्त करून जेरबंद करावे अशी मागणी आमदार समिर कुणावार यांनी पालकमंत्री पंकज भोयर यांच्याकडे केली आहे. खुर्सापार जंगलामध्ये गेल्यावर्षीपासुन एक वाघीण व तिचे तिन बच्छडे, आणि एक वाघ असे एकुण ५ ते ६ वाघांचे वास्तव्य आहे.या वाघांकडून आतापर्यंत अनेक जनावराचे शिकार करण्यात आली आहे.