काल सकाळच्या सुमारास कल्याण पश्चिम येथील निक्की नगर परिसरामध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे. निक्की नाका परिसरातून एक महिला आपल्या मुलाला शाळेत सोडून परत येत असताना भरधाव ट्रकने तिला पाठीमागून जोरदार धडक दिली आणि ती महिला त्या ट्रक खाली चिरडल्या गेल्याने त्या महिलेचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर ट्रक चालकाने पळ करण्याचा प्रयत्न केला मात्र नागरिकांनी तत्परता दाखवता ट्रक अडवला आणि त्याला पकडून खडकपाडा पोलिसांच्या ताब्यात दिले. मात्र या घटनेचा अंगावर काटा आणणारा थरारक सीसीटीव्ही समोर आला