तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथे जमिनीच्या वादातून एका ५० वर्षीय शेतकऱ्याला जीवे मारण्याच्या उद्देशाने दगडाने आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी एकाच कुटुंबातील चार जणांविरोधात नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रदिप शिवाजी घुगे (वय ५०, रा. अणदूर) असे जखमी शेतकऱ्याचे नाव आहे. ५ सप्टेंबर रोजी चार वाजता नळदुर्ग पोलिसांनी ही माहिती दिली आहे.