कल्याण होऊन माळशेज मार्गे कल्याण आगाराची बस नगरला जात असताना अचानक बसचे मुरबाडच्या पुढे स्टेरिंग रॉड तुटल्याने बस पुढे जाऊन रस्त्याच्या बाजूला रस्त्या च्या बाजूला जाऊन झाडावर धडकल्याने भीषण अपघात झाला. वीस ते पंचवीस प्रवासी घेऊन जात असलेल्या बसचा अपघात झाल्याने काही प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही परंतु बसचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.