आगामी काळात जिल्ह्यात गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद हे सण साजरे केले जाणार आहे. या उत्सवाच्या मिरवणुकीमध्ये लेझर लाईटचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याने मानवी जिवीताला धोका, आरोग्याला, सुरक्षिततेला धोका तसेच जनतेमध्ये गोंधळ निर्माण होणे, तसेच भांडण निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवण्याची शक्यता आहे. त्यामुळे मिरवणुकीमध्ये लेझर लाईट वापरास प्रतिबंध करण्यात आला आहे. तसे आदेश आज दि 21 आगस्ट सायंकाळी 5 वाजता जिल्हा पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांनी निर्गमित केले आहेत.