अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतावर आज राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी भेट देऊन पाहणी केली. या वेळी शेतकऱ्यांनी आपली व्यथा जानकर यांच्यासमोर मांडली. यावेळी जानकर यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीची पाहणी करत राज्य सरकारने तातडीने मदत जाहीर करावी, अशी मागणी केली. तसेच कृषिमंत्री दत्ता भरणे यांनी शेतकऱ्यांना आत्महत्येच्या दुष्टचक्रातून बाहेर काढण्याचे केलेले आश्वासन स्वागतार्ह असल्याचे सांगत त्यांनी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी मत मांडले.