इचलकरंजी शहरातील गंभीर पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने आज गुरुवारी दि.11 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता महापालिका प्रशासनावर तीव्र संताप व्यक्त केला.गेल्या अनेक वर्षांपासून आठवड्यातून केवळ एकदाच पाणी मिळत असल्याने नागरिक त्रस्त असून, याविरोधात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शहर अभियंता अभय शिरोलीकर व पाणीपुरवठा विभागाचे बाजीराव कांबळे यांना धारेवर धरले.या वेळी माजी नगरसेवक शशांक बावचकर,सागर चाळके, प्रकाश मोरबाळे,बाबासाहेब कोतवाल आदींनी पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली.