इंदिरानगर,चेतना नगर येथे गळफास घेऊन 21 वर्षे तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडली असून इंदिरानगर पोलीस ठाण्यात आकस्मत मृत्यूची नोंद करण्यात आली. निलेश शिवाजी पाटील राहणार परीश्राम हाइट्स, सेंट फ्रान्सिस जवळ, चेतना नगर याने राहत्या घरातील बेडरूम मध्ये सिलिंग फॅनला साडीच्या साह्याने गळफास घेतला. औषध उपचारासाठी त्याचा भाऊ शरद पाटील यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टर वर्मा यांनी तपासून मयत घोषित केले.