ग्रामविकास मंत्रालयाकडून मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान हे लोकायुक्त अभियान 17 सप्टेंबर ते 31 डिसेंबर 2025 दरम्यान राबविण्यात येणार आहे. गावांचा विकास होण्याच्या दृष्टीने हे एक सकारात्मक पाऊल आहे. या अभियानात सर्व ग्रामस्थांनी मिळून एकत्रित काम केल्यास गावांचा विकास शक्य असल्याचे मत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केले. रायगड जिल्हा परिषद अंतर्गत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान जिल्हास्तरीय कार्यशाळा आज दुपारी बारा वाजता कुरुळ येथील आरसीएफ सभागृहात पार पडली.