हॉटेलमध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या रूम मध्ये लावलेल्या पॅन्ट मधून अज्ञाताने ३ हजार ९०० रुपये लंपास केल्याची घटना शेगाव शहरातील हॉटेल रसिका येथे २१ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५.३० वाजे दरम्यान उघडकीस आली आहे.याबाबत हॉटेल रसिकाचे मॅनेजर संदीप शालीग्राम सिरसाट यांनी शेगाव शहर पोलीस स्टेशनला तक्रार दिली की, हॉटेल मध्ये काम करणारे गजानन पाटील व गणेश बिल्ला यांनी रूम मध्ये लटकून ठेवलेल्या दोघांच्या खिशातून अनोळखी इसमाने हॉटेल चे पाठी मागुन येवुन हॉटेलचा दरवाजा उघडुन आत करून लंपास केले.