गणेशोत्सवाच्या अनुषंगाने बीड शहरात ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जवळपास ४ हजारापेक्षा जास्त पोलीस कर्मचारी-अधिकारी तैनात करण्यात आले आहेत. दोन अप्पर पोलीस अधिक्षक, चार उपविभागीय पोलीस अधिकारी, १९ पोलीस निरीक्षक, ७२ उपनिरीक्षक व सहाय्यक निरीक्षक, दीड हजार पोलीस कर्मचारी, एसआरपीएफच्या तीन तुकड्या, सहाशे पुरुष व शंभर महिला होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत.