आज दि. 6 सप्टेंबर रोजी दुपारी 3 च्या सुमारास धर्माबाद येथील कासट ट्रेडिंग कंपनीचा सोयाबीन माल भरून 16 टायर चा ट्रक क्र. TS-08-T-1557 हे कुंडलवाडीकडे निघाले असता हा ट्रक बाभळी गाव ते बाभळी पुलाच्या मध्ये असणाऱ्या वळण रस्त्यानजीक पलटी झाला होता, यातील चालक हा सुखरूप आहे मात्र सोयाबीनची पोती ट्रक पलटी झाल्याने नुकसान झाले होते. यांसह ट्रकच्या पाट्या देखील क्षतीग्रस्त झाले असल्याचे पाहायला मिळाले आहे.