अखिल भारतीय तेलुगु महासंघाच्या वतीने जिल्हा परिषद कर्मचारी भवन येथे दिनांक 29 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजता तेलुगु भाषा दिवसाचा भव्य उत्सव उत्साहात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात श्री मुत्यालम्मा मातांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. त्यानंतर प्रास्ताविक होऊन मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. या वेळी सुनील मीद्दे यांनी समाज बांधणीसाठी तेलुगु भाषेचा अधिक वापर व्हावा तसेच भाषा शिकवण्यासाठी स्वतंत्र वर्ग सुरू करण्याची आवश्यकता असल्याचे मत मांडले.