एरंडोल तालुक्यातील पिंपरी बुद्रुक फाट्यावर गुरुवारी, २१ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात माळपिंप्री येथील प्रिय रंजन महाराज (वय ४५) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांना घेण्यासाठी आलेल्या प्रवीण नारायण पाटील (वय २७) हा तरुण गंभीर जखमी झाला.