कोरेगाव तालुक्यातील कण्हेरखेड येथील वादग्रस्त रास्त भाव दुकानावरील कारवाईबाबत जिल्हा पुरवठा कार्यालयाने नरमाईची भूमिका घेतल्याच्या पार्श्वभूमीवर पुण्याच्या पुरवठा उपायुक्त रमेश बेंडे यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने यांना निर्देश दिले असून दुकानदारावर आता फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा चेंडू आता त्यांच्या कोर्टात आला आहे.श्रीमंत महादजी शिंदे शेतकरी संस्थेचे अध्यक्ष किशोर शिंदे यांनी शुक्रवारी सकाळी ११ वाजता याबाबत पत्रकारांना माहिती दिली.